|| श्री ||
गढीचा इतिहास जागा झाला !
काल मी पंढरपूर जवळ गुरसाळे गावी असलेल्या उध्वस्थ गढीची माहिती माझ्या वोल वर दिली होती . लोकांना ती चांगलीच आवडली . फेसबुक , व्हाट्स अप अश्या सगळीकडून उस्फुर्त प्रतिक्रिया आल्या . काही फोन पण आले . यापैकी एक फोन जो माझे मित्र श्री यशपाल खेडकर सरांचा होता तो खूप महत्वाचा होता . श्री यशपाल खेडकर सर हे स्वेरी च्या कॉलेज ऑफ इंजीनिअरींग येथे प्राध्यापक आहेत त्यांनी गुरसाळ्याच्या या गढीचा इतिहास मला सांगितला . आणि त्या इतिहासाची त्यांच्या कडे असणाऱ्या " सोलापूर जिल्ह्याचा इतिहास " या पुस्तकातली माहितीही मला पाठवली . सोलापूर जिल्ह्याचा इतिहास हे पुस्तक श्री गोपाळराव देशमुख यांनी लिहिले आहे . त्या पुस्तकातील माहिती पुढील प्रमाणे हैद्राबाद सरकारने मध्यवर्ती अभिलेख कार्यालयातील निवडक कागद पत्राचे प्रकाशन तीन खंडात केले आहे . त्यातील भाग १ चे पृष्ठ २६८ वर आलेली माहिती गुरसाळे येथील कवड्यांचे वाड्या संबंधी आहे ती पुढील प्रमाणे ,
" पंढरपूरचे लढाईचे समयी मानाजीने आपली स्त्री गुरसाळे नजीक पंढरपूर येथे महिपतराव कवड्याचा लेक आवजी कवड्या याचे आश्रयाने छपावुन ठेवली . लढाईत मानाजीची शिकस्त होऊन फरारी होऊन गेल्यानंतर आवजी कवड्याने पंतप्रधानाचे ( सवाई माधवराव ) कारपरदारास ( नाना फडणीसास ) इतीला केली. ( माहिती दिली ) यांनी लिहून पाठविले कि तुमापासीच ठेवणे . मानाजी फाकड्या शरीक आहे . त्याची फहमायश करून आपले इजमामात ठेवावा व मानाजी महादजी शिंद्याचे बिरादरात येकसुइने राहिल्यास सरफरायी करावी हाही मनसुबा कारपरदासाचा आहे " १०४ लेखांक ८९ . १६ ऑगस्ट १७८१
पहा मंडळी म्हणजे या गढीचा संबंध थेट पेशवाई आणि तिच्या पराक्रमी सरदाऱांपर्यंत येउन पोहोचला. अतुलनीय पराक्रम गाजवणाऱ्या व्यक्तीला फाकड्या असे संबोधले जाई . आजही गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला आपण " शाबास रे फाकड्या " असे म्हणतो . मानाजी फाकडे हा मराठेशाहीच्या तीन फाकड्यापैकी एक कर्तबगार , पराक्रमी , क्रूर असा सरदार राघोबा दादांच्या पक्षाचा होता . पानिपतच्या युद्धानंतर महादजी शिंद्यांना ग्वाल्हेर ची जहागीर मिळेपर्यंत सहा सात वर्षे मानाजी तेथील गढीचा मालक होता . महिपतराव कवडे , त्यांचा लेक आवजी कवडे हे राघोबा पक्षाचे होते .त्यामुळे संकट समयी मानाजीने आपली पत्नी कवडे यांच्या या गुरसाळयाच्या गढीत सुरक्षेच्या कारणास्तव ठेवली होती .
महिपतराव कवडे यांचा पुत्र आवजी कवडे यानेच पंढरपूर विठ्ठल मंदिरात देवाचे दक्षिण बाजूस लक्ष्मीचे मंदिर बांधलेले असल्याचा उल्लेखही या पुस्तकात आहे .
पुस्तकात पुढे लेखक म्हणतात कि गुरसाळे येथील कवड्याचे वाड्याचे पश्चिम बाजूस बांधीव असलेली पाण्याची विहीर एक सुंदर बांधणीची असून अजूनही ती चांगल्या अवस्थेत आहे . ( हि विहीर मी आत उतरून बघितलेली आहे . आत काही भूयारांचे मार्ग पोहोचलेले आहेत ) कवडेंचा ऐतिहासिक वाडा जरी ढासळला असला तरी पाण्याची बारव मात्र एकवेळ आवर्जून पहावी अशी आहे . गुरसाळे प्रमाणे कवड्यांचे इनाम गाव अजनुज येथे उत्तम बांधणीचा तटबंधी वाडा विस्तीर्ण स्वरुपात आहे . तो अद्यापही बऱ्यापैकी अवस्थेत आहे .
पुण्यात कवड्यांचा वाडा होता . कुरकुंभच्या देवीची पुनर्बांधणी , गुरसाळे येथील वाडा आणि विहीर , अजनुज तालुका श्रीगोंदा येथील वाडा आणि विहीर हि ऐतिहासिक कामे आजही पाहण्यासाठी इतिहास अभ्यासकांनी जावे अशीच आहेत . ....... श्री गोपाळराव देशमुख ... ( सोलापूर जिल्ह्याचा इतिहास )
--------------------------------------------------------------------------------------------------------
पहा मंडळी केवढा इतिहास दडलेला आहे आपल्या आजूबाजूला . गुरसाळे हे गाव फक्त साखर कारखान्यामुळे आपल्याला परिचित होते मात्र या गावाचा संबंध पराक्रमी फाकडे सरदार आणि पेशवाइ शी संबंधित आहे हे पहिल्यांदाच समजलं . कवड्यांची विश्वास पात्रता सुद्धा यातून दिसून येते कि मानाजी फाकडे सारख्या सरदाराने कठीण काळात सुरक्षेसाठी आपली पत्नी कवडेंच्या या गढीत सुरक्षित ठेवली . धन्य आहे .......

जाता जाता :---- मी या गढीत काल गेलो तेंव्हा माझ्या सोबत गढी दाखवण्यासाठी गुरासाळयाचे जे माझे मित्र आले होते त्यांचे नाव सचिन कवडे . काय योगायोग आहे कि या गढीचे मालक एक कवडेच होते आणि मला काल या गढीत फिरण्यासाठी वाट दाखवत ज्यांनी मदत केली ते सुद्धा कवडेच होते . त्या सरदार कवडेंचे हे कुणी वारसदार आहेत का हे मला माहित नाही. त्यांनाही या गढीचा इतिहास सांगता आला नाही . सगळ्या योगायोगाच्या गोष्टी .................. श्याम सावजी .... पंढरपूर

NICE INFORMATION..
ReplyDeleteधन्यवाद .. खूप आभार
Deleteमला कवडे सरदार यांच्या बद्दल माहिती मिळेल का
ReplyDelete