|| श्री ||
पंढरपूरातील देवी दर्शन. . 1
अंबाबाई पटांगणातली देवी
पंढरपूरच्या ईशान्येला चंद्रभागेच्या काठावर हे देवीचे मंदिर आहे. मोठ्या विस्तीर्ण वृक्षांनी हे मंदिर वेढलेले आहे. मंदिरासमोरच्या एका वृक्षाच्या ढोलीत एक माणूस सहज बसू शकेल इतकी मोठी ढोली या वृक्षाला आहे या वरून या वृक्षाची जाडी आणि जुनेपण लक्षात यावे. मंदिर साधे सुबक आहे. मंदिरात देवीची सुबक मूर्ती आहे . तुळजापुरच्या देवीचीच हि प्रतिकृती असल्याचे म्हटले जाते . निसर्ग रम्य वातावरणात असलेल्या या मंदिरात पंढरपूरकर मोठ्या प्रमाणावर मंगळवार आणि शुक्रवारी गर्दी करतात . नवरात्रीत तर या मंदिराबाहेरील रांग संपता संपत नाही .पंढरपुरातील हे मुख्य देवी मंदिर आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही . पूर्वी या मंदिराच्या कडेने असणाऱ्या मैदानाला आंबाबाईचे पटांगण म्हटले जायचे . या मैदानात क्रिकेटचे सामने नेहमीच भरायचे .
...आम्ही जुन्या पेठेत राहायला आल्यावर त्यावेळी आमची परिस्थिती तशी वाईट होती . माझ्या घरच्यांनी या देवीच्या दर्शनाला जायला सुरुवात केली . योगायोगाने आमची परिस्थिती सुधारली . चांगले दिवस आले . समृद्धी आली . स्वतःचे घर खरेदी केले . या देवीवरची आमच्या घरच्यांची श्रद्धा वाढली .आणि मग हे देवीचे देऊळ नवरात्रीत रंगवण्याचा खर्च आमच्या घरच्यांनी देण्यास सुरुवात केली . देवळाच्या भिंतींवर पौराणिक प्रसंग वनारे पेंटर खूपच सुंदर पद्धतीने काढायचे . काही वर्षे ह्या उपक्रमात सातत्य राहिले मात्र काही कारणा वरून मंदिराच्या पुजाऱ्याशी तात्विक मतभेद झाल्याने आमच्या घरच्यांनी हा उपक्रम बंद केला आणि मग मंगळवेढा रोडला असणाऱ्या घाडग्यांच्या देवीला जायला आमच्या घरच्यांनी सुरुवात केली .. या घाडग्यांच्या देवी बद्दल मी सांगणार आहेच पण तो पर्यंत जगदंब . सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा ! .... श्याम सावजी ..पंढरपूर

No comments:
Post a Comment