|| श्री ||
............आषाढाचा पहिला दिवस आणि माझे पहिले आकर्षण ! .......................... .....
आषाढाचा पहिला दिवस म्हणजे कालिदासाच्या अजरामर " मेघदूताच्या " आठवणीचा दिवस . आषाढ आणि श्रावणाचे प्रफुल्लीत दिवस मनामनावर गारूड न करतील तर नवल. यक्षाप्रमाणे जवळपास सगळ्यांचीच या दिवसात विरही अवस्था होतेच होते . माझीही पहिल्यांदा अशी अवस्था झाली ते दिवस मला चांगले आठवतात . तेंव्हा मी ५ वीत असेन . हिंदी गाण्यांचे शब्द थोडे थोडे कळायला लागले होते . " कभी कभी मेरे दिलमे खयाल आता है ! " सारखी गाणी तेंव्हा रेडिओवर जोरात धुमाकूळ घालत होती . त्यांचा काही प्रमाणात तरी परिणाम आमच्यावर होतंच होता ..त्यात एक दिवस ती दिसली . शाळेच्या मैदानातच . कोण ?, कुठली ? कितवीत आहे ? काहीच माहित नाही पण आवडली . मग रोज नजर तिला शोधायला लागली . कधी दिसायची कधी नाही . ती दिसली कि " कभी कभी मेरे दिलमे खयाल आता है " हे गाणं आठवायचं . आणि हे गाणं ऐकलं कि ती आठवायची . देवळाच्या परिसरात मी इंग्रजीसाठी शिकवणी लावली होती . या शिकवणीवरून परतताना एकदा अचानक ती तिथे दिसली . काही जणींच मिळून दोरीवरच्या उड्या मारणं सुरु होतं .

" अरेच्चा हि इथे राहते काय ! "
आता मी शिकवणीला जाताना आणि परतताना ती दिसतेय का बघायला लागलो .मंदिराच्या त्या परिसरात उदबत्त्यांची खूप दुकाने होती त्यामुळे वातावरणात एक धुंद सुगंध भरलेला असायचा . त्यात ती दिसली कि वातावरण आणखी धुंद व्हायचा . पण बरेचदा निराशाच पदरी यायची . एकदा अचानक ती माझ्या शिकवणीतच दिसली आणि तेंव्हा समजलं कि ती ७ वीत आहे . म्हणजे माझ्या पुढे २ वर्षे . म्हणजे मी तिच्या पेक्षा २ वर्षे लहान होतो. माझा विरस झाला . पण तरी तिचं आकर्षण कमी झालं नाही . ती दिसावी असं कायम वाटायचं. नंतर ती तिच्या वर्ग मित्रांबरोबर गप्पा गोष्टी करताना दिसायला लागली . " कभी कभी " मध्ये शशी कपूरची राखीच्या आयुष्यात एन्ट्री झाल्यावर अमिताबची जशी अवस्था होते तसं काहीसा माझं झालं. तिच्या लेखी मी कुठेच न्हवतो . माझ्याही ते लक्षात आलं . एक निराशेची भावना मनात आली आणि मी देवळाच्या त्या भागात जायचं बंद केलं . योगायोगाने ती शिकवणी बंद करून मी घराजवळच्या दुसऱ्या एका शिकवणीत जायला लागलो . आणि काही दिवसांनी चक्क तिला विसरून गेलो. नंतर तीही कधी दिसली नाही . पण आजही देवळाच्या परिसरातून जाताना उदबत्त्यांचा तो धुंद सुवास जाणवला कि ती आठवून जाते तशीच दोरीवरच्या उड्या मारताना दिसलेली . .......................... ..श्याम सावजी ....पंढरपूर
—
वाह, मस्त लेख ! "कभी कभी" ची आठवण भारी आहे ! आणि शेवट तर खासच ! पुलंनी असे विशिष्ट गंध आणि आपली स्मरणं या विषयी खास लिहून ठेवलंय त्याची आठवण झाली !
ReplyDeleteमजा आली वाचायला !
वा वा वा ... खूप आभार भाग्येश भाऊ .. आनंद वाटला . धन्यवाद
Deleteती सध्या काय करते .. शामराव ..
ReplyDeleteती सध्या तिच्या शशी कपूर कडे आहे
ReplyDelete